Sunday, June 1, 2025
HomeपरभणीDistrict & Sessions Court : सेलूत 'अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय'...

District & Sessions Court : सेलूत ‘अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय’ स्थापन करा: वकिलांची मागणी

(Additional District & Sessions Court) :  दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) आणि अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय स्थापन करण्याची अनेक वर्षांपासूनची मागणी आता जोर धरू लागली आहे. या मागणीसाठी तालुका वकील संघाने गुरुवारी पुढाकार घेतला.

वकिलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे यासंदर्भात विविध मागण्यांचे निवेदन दिले आहे. इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असल्यामुळे, सेलू येथे दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) व अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय स्थापन करण्याच्या सेलूकरांच्या मागणीचा विचार करून न्यायालयास मान्यता द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Most Popular