Sunday, June 1, 2025
Homeशेती100 Percent Subsidy : खरीपाच्या पेरणीसाठी या पिकांचे बियाणे मिळणार १०० टक्के...

100 Percent Subsidy : खरीपाच्या पेरणीसाठी या पिकांचे बियाणे मिळणार १०० टक्के अनुदानावर? कसा घ्याल लाभ

राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान-अन्नधान्य पिके व वाणिज्यिक पिके आणि राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-तेलबिया अंतर्गत पिकांच्या उत्पादकता वाढीसाठी व बियाणे बदल करणे म्हत्वाचे आहे.
याचे महत्व विचारात घेता सुधारित/संकरीत वाणांचे प्रसाराच्या दृष्टीने प्रमाणित बियाणे वितरण व पीक प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या घटकांतर्गत आर्थिक सहाय्य प्रति शेतकरी किमान ०.२० हे ते कमाल १ हेक्टरपर्यंत मर्यादित आहे.

१००% अनुदानावर कोणती पिके मिळतील?(100 Percent Subsidy)

प्रमाणित बियाणे वितरण या घटकाचा लाभ वैयक्तिक शेतकऱ्यांना देण्यात येणार असून सोयाबीन, भुईमुग, सुर्यफुल व तीळ या पिकांकरिता १००% अनुदानावर बियाणे उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

अन्य पिकांसाठी अनुदान

तसेच भात, तुर, मुग, उडीद, मका, बाजरी, नाचणी, वरई या पिकांकरिता अनुदानावर प्रमाणित बियाणे उपलब्ध आहे.

लाभ घेण्याची प्रक्रिया

  1. महाडीबीटी संकेतस्थळावर अर्ज करावा
    • बियाणे वितरण, प्रात्यक्षिक, फ्लेक्सी घटक, औषधे आणि खते या टाईल अंतर्गत शेतकऱ्यांना अर्ज करता येतील
    • प्रथम लाभार्थी निवड यादी दि. ३०.०५.२०२५ रोजी जाहीर करण्यात येईल
  2. आवश्यक कागदपत्रे
    • ७/१२ उतारा
    • कोणतेही एक ओळखपत्र
  3. अर्ज प्रक्रिया
    • शेतकऱ्यांनी ७/१२ उताऱ्यासह कोणतेही एक ओळखपत्र बियाणे वितरकाला दाखवून अनुदान वजा जाता लोकवाटा भरुन प्रमाणित बियाणाचा लाभ घ्यावा
    • प्रमाणित बियाणे घटकास अर्ज सादर करणेसाठी शेतकऱ्यांची Agristack वर नोंदणी असणे बंधनकारक आहे
    • लाभार्थी निवड प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य (FCFS) या तत्वावर करण्यात येणार आहे

अधिक माहितीसाठी

प्रमाणित बियाणे वितरण या घटकाचा लाभ घेणेसाठी जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी प्रमाणित बियाणे वितरण या घटकाचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.

Most Popular