केंद्र आणि राज्य सरकारच्या कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांसाठी ‘फार्मर आयडी’ (Farmer ID)अनिवार्य करण्यात आला आहे. या आयडीसाठी शेतकऱ्यांनी ३१ मे २०२५ पर्यंत ‘ॲग्रीस्टॅक’ या डिजिटल प्लॅटफॉर्मवर नोंदणी करणे आवश्यक आहे
फार्मर आयडीचे फायदे:
-
शेतकऱ्यांना डिजिटल ओळखपत्र मिळेल, ज्याच्या आधारे त्यांच्या जमिनीची माहिती, पीक प्रकार, सिंचन व्यवस्था इत्यादींचा तपशील शासनाकडे उपलब्ध होईल.
-
यामुळे विविध योजनांचा लाभ, अनुदान, पीएम किसान योजना, बियाणे व खते अनुदान, महाडीबीटी पोर्टलवरील अर्ज इत्यादींसाठी फार्मर आयडी आवश्यक ठरेल.
नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे:
-
आधार कार्ड
-
आधार लिंक असलेला मोबाइल क्रमांक
-
सातबारा उतारा
शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या सीएससी (कॉमन सर्व्हिस सेंटर) केंद्रावर जाऊन ही नोंदणी पूर्ण करावी. नोंदणी प्रक्रियेत अडचण आल्यास तालुका कृषी अधिकारी किंवा कृषी विभागाशी संपर्क साधावा.